by 𝗔𝗴𝗿𝗼𝘄𝗻𝗲𝘁™
मेथी लागवड भाजीपाला पिकांमध्ये मेथी ही महाराष्ट्रातील लोकप्रिय पालेभाजी असून मेथीचा वापर आहारात विवि...
मेथी लागवड भाजीपाला पिकांमध्ये मेथी ही महाराष्ट्रातील लोकप्रिय पालेभाजी असून मेथीचा वापर आहारात विविध प्रकारे करण्यात येतो. महाराष्ट्रात बहुतेक सर्व जिल्ह्यांत मेथीची लागवड केली जाते. मोठ्या शहरांच्या आसपासच्या भागात मेथीच्या लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. महाराष्ट्रातील हवामानात मेथीचे पीक खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात घेता येते. भातीचा सतत पुरवठा होण्यासाठी टप्याटप्याने लागवड करून जवळजवळ वर्षभर मेथीचे पीक घेता येवू शकते. महत्व :मेथीची हिरवी पाने आणि कोवळ्या फांद्या भाजीसाठी वापरतात. मेथीच्या बियांचा म्हणजे मेथ्थांचा मसाल्यामध्ये आणि लोणच्यामध्ये उपयोग करतात. मेथीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. मेथीची भाजी पाचक असून मेथीच्य भाजीमुळे यकृत आणि प्लिहा यांची कार्यक्षमता वाढून पचनक्रिया सुधारते. मेथीमध्ये प्रोटीन्स आणि मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह इत्यादी खनिजे तसेच अ आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणाते असतात. मेथीच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात पुढील अन्नघटक असतात. अन्नघटक प्रमाण(0%) अन्नघटक प्रमाण (0%) पाणी 86 कार्बोहायड्रेटस् 0 प्रोटीन्स् 4 फॅटस् 0.9 तंतुमय पदार्थ 1 खनिजे 1.5 मॅग्नेशियम 07 फॉस्फरस 0.005 सोडियम 08 कॅल्शियम 0.4 पोटॅशियम 05 लोह 0.02 सल्फर 02 क्लोरीन 0.02 जीवनसत्व अ 6450 जीवनसत्व क 05 उष्मांक (कॅलरीज) 49 हवामान आणि जमीन :मेथी हे थंड हवामान वाढणारे पीक आहे. विशेषत: कसुरी मेथीस थंड हवामान मानवते म्हणून हिवाळ्यात ह्या मेथीची लागवड करतात. मेथी हे कमी दिवसात तयार होणारे पीक आहे. विविध प्रकारच्या हवामानांत मेथीचे पीक येत असते तरी उष्ण हवामानात पिकाची वाढ कमी होऊन चांगल्या दर्जाची भाजी मिळत नाही. मेथीच्या लागवडीसाठी मध्यम ते कादार आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी. उन्नत जाती : मेथी हे शेंगा कुळातील पीक असून मेथीचे मुख्य दोन प्रकार आहेत.कसुरी मेथी : ह्या मेथीची पाने लहान, गोलसर असून तिची वाढ सुरुवातीला फारच सावकाश होते. ह्या मेथीची रोपे लहान झुडूपवजा असतात आणि फांद्या आणि देठ नेहमीच्या मेथीपेक्षा बारीक असतात. ह्या मेथीची फुले आकर्षक पिवळ्या रंगाची, लांब दांड्यावर येणारी असून शेंगा लहान, कोयत्याच्या आकाराच्या आणि बाकदार असतात तर बिया नेहमीच्या मेथीपेक्षा बारीक असतात. कसुरी मेथी अधिक सुगंधित आणि स्वादिष्ट असते. कसुरी मेथीमध्ये कसुरी सिलेक्शन (पुसा सिलेक्शन) ही सुधारित जात असून, ती 2 महिन्यात तयार होते. ही जात उशीरा तयार होणारी असली तरी तिचे अनेक खुडवे घेता येतात आणि ही जात परसबागेत लावण्यास फारस उपयुक्त आहे. नेहमीची मेथी :ही मेक्षी लवकर वाढते. या मेथीला भरपूर फांद्या येतात आणि वाढीची सवय उभट असते. या मेथीची पाने लंबगोल किंवा गोलसर असतात. या मेथीची फुले पांढरी असून ती शेंड्याकडे पानाच्या बेचक्यातून प्रत्येक ठिकाणी दोन किंवा तीन येतात. या मेथीच्या शेंगा लांब आणि बी मोठे असते. यामध्ये पुसा अर्ली बंचींग ही सुधारित जात विकसित करण्यात आली आहे. बर्याच ठिकाणी स्थानिक वाणांची लागवड केली जाते. हिरवी, कोवळी कुसकुशीत पाने, लवकर फुलावर न येणे, कोवळेपणा जास्तीत जास्त टिकून राहाणे चांगल्या जातीची काही वैशिष्ट्ये आहेत.